कोवलम (केरळ)- केरळच्या कोवलममध्ये गुरुवारी समुद्राखाली एक लग्न झाले. देशातील हे पहिलेच पाण्याखालचे लग्न आहे. महाराष्ट्राच्या निखिल पवारने स्लोव्हाकियाच्या २३ वर्षीय युनिकासोबत लग्न केले. विशेष म्हणजे दोघांनी समुद्रात ४ मीटर खोल पाण्यात लग्नाचा सर्व विधी पूर्ण केला.
सुमारे अर्धा तास चाललेले हे लग्न ख्रिश्चन रीतिरिवाजानुसार झाले. दोघांनी एकमेकांना प्लेकार्ड दाखवून एकमेकांप्रति समर्पणाच्या शपथा घेतल्या. समुद्रातील या लग्नाचे १० लोक साक्षीदार बनले. पाण्यात फुलांची सजावटही केली होती. निखिल कोवलममध्ये डायव्हिंग प्रशिक्षक म्हणून काम करतो, तर युनिका राज्यशास्त्राची विद्यार्थिनी आहे. नंतर ते स्लोव्हाकियात चर्चमध्ये लग्न करणार आहेत.
पाण्याखालीच केले होते प्रपोज
निखिल व युनिकाची भेट ७ महिन्यांपूर्वी झाली होती. दोघेही नियमित डायव्हिंग करत होते. मागच्या सोमवारी निखिलने ‘विल यू मॅरी मी’ लिहिलेले प्लेकार्ड दाखवून डायव्हिंग करतानाच युनिकाला प्रपोज केले होते.
निखिल व युनिकाची भेट ७ महिन्यांपूर्वी झाली होती. दोघेही नियमित डायव्हिंग करत होते. मागच्या सोमवारी निखिलने ‘विल यू मॅरी मी’ लिहिलेले प्लेकार्ड दाखवून डायव्हिंग करतानाच युनिकाला प्रपोज केले होते.